VIDEO : पायलटकडून विमानातच एअर हॉस्टेसला प्रपोज
एबीपी माझा वेब टीम | 04 Jan 2018 06:06 PM (IST)
लग्नाची मागणी करत जॉन इमरसन यांनी लॉरेनला हिऱ्याची अंगठी दिली आणि लॉरेननेही लगेच अंगठी स्वीकारली.
मुंबई : प्रेयसीला प्रपोज करण्याची प्रत्येकाची एक स्टाईल असते. कुणी पत्र पाठवतं, कुणी व्हॉट्सअप मेसेज, कुणी थेट भेटून, कुणी थेट प्रेयसीच्या घरी जातं, तर कुणी आणखी कसंतरी... प्रपोज करण्याच्या पद्धती काही कमी नाहीत. पण अमेरिकेतील एका पायलटने विमानातच प्रेयसीला लग्नासाठी विचारणा केली. तीही अगदी अत्यंत रोमँटिक स्टाईलने. अमेरिकेतील डेट्रॉइटमधून नेहमीप्रमाणे विमान निघालं होतं. प्रवाशांसाठी सूचना दिल्या जात असताना एका वेगळाच प्रसंगाची प्रवाशांना पाहायला मिळाला. जॉन इमरसन या अमेरिकेतील पायलटने त्याच्या प्रेयसीला थेट विमानातच लग्नासाठी विचारणा केली. लॉरेन असे प्रेयसीचं नाव असून, ती त्याच विमानत एअर हॉस्टेस होती. लग्नाची मागणी करत जॉन इमरसन यांनी लॉरेनला हिऱ्याची अंगठी दिली आणि लॉरेननेही लगेच अंगठी स्वीकारली. लॉरेनने जॉन इमरसनकडून अंगठी स्वीकारल्यानंतर, होकार मिळाल्यानंतर विमानातील उपस्थित सर्व प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.