वॉशिंग्टन : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेत दाखल झाले. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली.
या भेटीत भारतातून तस्करी करून आणलेल्या 200 दुर्मिळ मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. यावेळी ब्लेअर हाऊसच्या अॅटर्नि जनरलही उपस्थित होत्या.
या दुर्मिळ मूर्तींमध्ये ब्रांझच्या गणपती मूर्तींसोबत जैन धर्मियांची बाहुबालीच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल दहा कोटी अमेरिकन डॉलर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, " काहींना या मूर्तींचे मूल्य पैशांच्या स्वरूपात वाटत असेल, मात्र आमच्यासाठी हा संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे.''
यातील अनेक मूर्ती या दोन हजार वर्ष प्राचीन आहेत. यातील एक संतमणी विचावर यांची आहे. या मूर्तीला चेन्नईच्या शिलाँग मंदिरातून चोरण्यात आले होते.
या मूर्तीसंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण करून त्या भारतात आणल्या जातील, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते प्रकाश स्वरुप यांनी सांगितले.