गेल्या काही दिवसांत प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिंजऱ्यात पडलेल्या लहानग्यांच्या- मोठ्यांचा बातम्या आपण पाहतोय. त्यातच आणखी एका घटनेची भर पडली आहे.

 

टोकियोतल्या एका प्राणीसंग्रहालयातल्या 190 किलोच्या सिंहाने एका चिमुकल्यावर झेप घेतली. त्या दोघांमध्ये असलेल्या मजबूत काचेनं त्या लहानग्याचा जीव वाचवला. काचेच्या बाहेरुन हा मुलगा सिंहाला पाहत होता.अचानक झालेल्या सिंहाच्या हल्ल्यानं हा लहानगाही घाबरला आणि खाली पडला..