लंडन : लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला तब्बल 22 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 वर्षांच्या रिचर्ड हकलने आठ वर्षांच्या कालावधीत केलेल्या गुन्ह्यांसाठी ब्रिटनमधील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली.


 
2006 ते 2014 या कालावधीत रिचर्डने मलेशियामध्ये शेकडे बालकांचं लैंगिक शोषण केलं. या बालकांचं वय 6 महिने ते 12 वर्ष या वयोगटातलं होतं. बाल लैंगिक शोषणाशी निगडीत 71 आरोपांमध्ये रिचर्डने गुन्हे कबूल केले आहेत.

 



 
पोलिसांच्या माहितीनुसार रिचर्डच्या अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांची संख्या 200 च्या घरात आहे. यापैकी अनेक बालकं मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील होती. यापैकी अनेक मुलं निराधार किंवा गरिब घरातील होती. ब्रिटीश नागरिक असलेल्या रिचर्डला या गुन्ह्यांसाठी किमान 23 वर्ष तुरुंगात काढावी लागतील.

 
'लैंगिक शोषणांच्या इतक्या प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करण्याची वेळ क्वचित एखाद्या जजवर येते. ही शरमेची बाब आहे' असं रिचर्ड हकल प्रकरणी शिक्षा सुनावतात जज पीटर यांनी म्हटलं.