US President Elect अर्थात अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन (joe biden) यांना (Coronavirus) कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 78 वर्षीय बायडन यांना तूर्तास कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. जो बायडन हे कोरोनाच्या हाय रिस्क प्रवर्गात मोडतात.


जो बायडन (joe biden) यांना फायझरकडून तयार करण्यात आलेल्या (Coronavirus) कोरोना लसीचा पहिला डोस, देण्यात आला आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण जगासमोर हे वृत्त आलं.


देशातील नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी बायडन यांनी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून स्वत:ला ही लस टोचून घेतली. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं म्हणत त्यांनी लस घेतेवेळी देशातील नागरिकांना विश्वास देऊ केला.


कोरोना व्हा.रसची सुरुवात चीनमधून झाली असं म्हणण्यात येत असलं तरीही अमेरिकेमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित देशांमध्येही अमेरिकेचं नाव येतं. अशा परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी बायडन यांनी देशातील तमाम जनतेलाही लसीकरणात सहभागी होऊन ही लस टोचून घेण्याचं आवाहन केलं.


लसीकरणासाठी उचलली जाणारी एकूण पावलं आणि या प्रक्रियेला आलेला वेग पाहता पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 पासून इथं सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.





'कोरोना लसीवर विश्वास ठेवा'


काही दिवसांपूर्वीच बायडन यांनी कोरोना लसीवर विश्वास ठेवा असं, देशातील नागरिकांना सांगितलं होतं. प्रथन श्रेणीतील वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांतून विकसित केलेल्या या लसीवर विश्वास ठेवा असं म्हणत या लसीच्या मूल्यांकनासाठी राजकीय प्रभावाचा वापर करण्यात आला नसल्याची बाबही स्पष्ट केली होती.


अमेरिकेत एफडीएनं काही दिवसांपूर्वीच फायझरच्या लसीला देशात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. वैज्ञानिकांवर असणारा विश्वासच आपल्याला इथवर घेऊन आला आहे. सध्या आपल्यासमोर अनेक अडचणी आहेत. पण, येत्या काळात परिस्थिती नक्कीच सुधारेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.