दमास्कस : सीरियामधील रासायनिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं सीरियाच्या अनेक भागात क्षेपणास्त्र डागली आहेत. 50 टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांचा सीरियातील हवाई अड्ड्यांवर मारा करण्यात आला आहे.
मंगळवारी सीरियाच्या बंडखोरग्रस्त भागात रासायनिक हल्ला झाला होता. यामध्ये शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण जगात याबाबत चिंता व्यक्त होत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी बंदी असलेली रासायनिक अस्त्र वापरल्याची अमेरिकेची धारणा आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री अमेरिकेकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला.
पश्चिम सीरियातील होम्स प्रांतामधल्या शयरत हवाई अड्ड्यांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून व्हाईट हाऊस आणि पेंटागनमध्ये सीरियाविरोधातील कारवाईची रणनीती सुरु आहे.