Ransomware Attack : जुलैमध्ये अमेरिकेतील एका कंपनीवर रॅनसमवेअर हल्ला करण्याचा आरोप जो बायडनं सरकारनं युक्रेन आणि रशियाच्या दोन जणावर लावला आहे. न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात याबाबतची माहिती देण्याती आली आहे. यापैकी एका आरोपीकडून रॅनसमवेअर हल्ल्यात लुबाडलेली 60 लाख डॉलरची रक्कम जप्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील टेक्सास न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रानुसार, युक्रेनचा नागरिक यारोस्लाव वासिंस्की (22 वर्ष) आणि रशियाचा येवगेनी पॉलिनिन (28 वर्ष) यांच्यावर रॅनसमवेअर हल्ल्याचा आरोप लगावण्यात आलाय.


22 वर्षीय यारोस्लाव वासिंस्की याला गेल्या महिन्यात पोलंडमध्ये अटक करण्यात आली होती. आता यारोस्लाव याला रॅनसमवेअर हल्ल्याबाबतची उत्तरे द्यावी लागणार आहेत. अमेरिकामध्ये रेविल नावाच्या रॅनसमवेअर हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. या हल्ल्यामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्यांना कोट्यवधी डॉलरचा फटका बसला होता. चार जुलै रोजी वासिंस्कीने  फ्लोरिडा येथील साफ्टवेअर कंपनी कासेयावर रॅनसमवेअर हल्ला केला होता. याचा फटका जगभरातील कंपन्याना बसला होती. जगभरातील 1500 व्यावसायाला याचा फटका बसला होता. अमेरिकेनं वासिंस्की आणि त्याचा जोडीदारावरर फसवणूक आणि मनीलॅड्रींगचा आरोप लावला आहे.


रॅनसमवेअर म्हणजे काय?


रॅनसमवेअर म्हणजे ऑनलाइन जगातील खंडणीखोर होय. एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून किंवा एखाद्या बाबतीत अडवणूक करून खंडणी मागितली जाते, अगदी त्याच प्रकारे संगणक प्रणाली किंवा स्मार्टफोनवर रॅनसमवेअर हल्ला केला जातो. या हल्ल्यात हल्लेखोर आपल्याकडे असणाऱ्या सर्व फाइल्स एनक्रिप्ट करून टाकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या फाइल्स आणि माहिती अशा अगम्य भाषेत रूपांतरित केली जाते की त्यामुळे आपल्याला या फाइल्स उघडता येत नाहीत. यानंतर आपल्याला स्क्रीनवर ‘काही ठरावीक रक्कम अमुक एक खात्यात भरून आपण आपल्या फाइल्स आणि माहिती पूर्ववत करून घेऊ शकता’ असा संदेश दाखवला जातो.


रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?


तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका


ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.


जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.


पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.


ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा


फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.


तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा