USA Baby : जगात अशा काही गोष्टी घडतात की ज्या अगदीच आपल्याला आश्चर्यचकित करतता. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेतील एका जोडप्याने त्यांच्या बाळाच्या जन्माआधीच त्याची जन्मतारीख शेअर केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच दिवशी त्यांच्या बाळाचा जन्म झाला. विशेष म्हणजे बाळाच्या आई वडिलांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी आहे. याचाच अर्थ, संपूर्ण कुटुंबाचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. खरंतर, अमेरिकेतील हंट्सविले, अलाबामा येथील  हॉस्पिटलमध्ये कॅसिडी आणि डिलन स्कॉट या दाम्पत्याने 18 डिसेंबर रोजी आपल्या बाळाला जन्म दिला. त्यांना मुलगी झाली असून या मुलीचे नाव लेनन असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या आई-वडिलांचा वाढदिवसही 18 डिसेंबरलाच आहे.


हॉस्पिटलने शेअर केली पोस्ट


अलाबामा येथील हॉस्पिटलने या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. आणि लिहिले आहे की, कॅसिडी आणि डिलन स्कॉट या दाम्पत्याचे अभिनंदन. त्यांनी नुकताच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. कोणत्याही कुटुंबासाठी हा आनंददायी क्षण एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाही. पण या कुटुंबासाठी हे विशेष आहे कारण त्यांचा जन्म एकाच दिवशी म्हणजे रविवार, 18 डिसेंबर रोजी झाला होता.


हॉस्पिटलने पुढे लिहिले की, हे बरोबर आहे! जेव्हा त्यांची मुलगी लेननचा जन्म झाला तेव्हा 1,33,000 पैकी ही एक संधी आहे. हे कुटुंबीय रात्री साडेबारा वाजेपर्यंत ते जल्लोष साजरा करत होते. या सुंदर कुटुंबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमच्यात सामील व्हा! या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. ही पोस्ट 2000 हून अधिक लोकांनी लाईक केली आणि अनेक लोकांनी शेअर केली.


अनेक फेसबुक यूजर्सने कमेंट केली


"माझे पती, मी आणि आमचा पहिला मुलगा सर्वांचा जन्म एकाच दिवशी झाला. या क्लबमध्ये आपले स्वागत आहे! आमचा मुलगा नुकताच 31 वर्षांचा झाला आहे. तुम्हा सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!" दुसर्‍या यूजरने असे लिहिले की,"अभिनंदन! मला माझ्या तीन जावयांचा असाच अनुभव आला. त्या सर्वांचा जन्म 13 ऑक्टोबर रोजी झाला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर केल्या जात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या : 


North Korea : 'या' देशात रेड लिपस्टिकवर बंदी, किम जोंग उनचं अजब फर्मान; कारण आहे विचित्र