S Jaishankar On Terrorism: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केले. ज्यामध्ये दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचे ते म्हणाले. यावेळी एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले की, असे काही देश आहेत जे दहशतवादाशी लढण्याचा आपल्या सामूहिक संकल्पाला धक्का पोहचवत आहेत. याला थारा दिला जाऊ शकत नाही.


ते म्हणाले की, दहशतवादाशी संबंधित आव्हाने आणि नुकसानीमुळे भारतावर खोलवर परिणाम झाला आहे. जगाने दहशतवादाच्या वाईटावर कधीही तडजोड करू नये. भारताचा असा विश्वास आहे की दहशतवाद कोणत्याही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गटाशी जोडला जाऊ नये. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाच्या कोणत्याही रुपाचा आणि अभिव्यक्तीचा निषेध केला पाहिजे, तो कोणत्याही प्रकारे न्याय्य असू शकत नाही.


ते म्हणाले की, आयएसआयएसचे आर्थिक संसाधनांचे बळकटीकरण अधिक मजबूत झाले आहे, आता हत्यांना बिटकॉइनच्या रूपात देखील बक्षीस दिले जात आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, पद्धतशीर ऑनलाइन मोहिमांद्वारे कट्टरपंथी कार्यात कमजोर तरुणांचा सहभाग हा गंभीर चिंतेचा विषय आहे.


ते म्हणाले की आमच्याच शेजारच्या भागात, आयएसआयएल-खोरासन (ISIL-K) सतत विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील घटनांनी स्वाभाविकपणे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दोन्हीसाठी चिंता निर्माण केली आहे. एस जयशंकर म्हणाले की बंदी घातलेल्या हक्कानी नेटवर्कच्या वाढत्या कारवाया या वाढत्या चिंतेला न्याय देतात.


माजी राष्ट्रपती अशरफ घनी कुटुंबासह यूएईत आश्रयाला


अफगाणिस्तानात तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या भागांत आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.