US Visa Hike : अमेरिकेत (America) पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांसाठी आता व्हिसासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.अमेरिकेने व्हिसा दरात वाढ केली असून व्हिसाचे नवीन दर 30 मे 2023 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते पर्यटनापर्यंत जाऊ इच्छिणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे.
विशिष्ट नॉन-इमिग्रंट व्हिसा अॅप्लिकेशन (NIV) प्रक्रिया शुल्कात वाढ करण्याबाबत यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटने याबाबत प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिली आहे. 30 मे 2023 पासून प्रभावी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी विद्यार्थी व्हिसासाठी शुल्क (B1/B2) आणि नॉन-इमिग्रंट व्हिसा अॅप्लिकेशन आधारित विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसाच्या दरात 160 डाॅलरवरून वरून 185 डाॅलरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तात्पुरत्या कामगारांसाठी (H, L, O, P, Q, आणि R श्रेणी) ठराविक याचिका-आधारित (certain petition-based nonimmigrant visas) नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी शुल्क 190 वरून 205 डाॅलरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. करार व्यापारी, करार गुंतवणूकदार आणि विशेष व्यवसायातील (E श्रेणी) करार अर्जदारांसाठी शुल्क 205 वरून 315 डाॅलर पर्यंत वाढ होणार आहे. काही एक्सचेंज व्हिजिटर्ससाठी दोन वर्षांच्या रेसिडेन्सी आवश्यक शुल्काच्या माफीचा समावेश असलेल्या या नियमामुळे इतर कॉन्सुलर फी प्रभावित होत नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.
अगोदर केलेल्या प्रक्रियेवर काय परिणाम होणार
"मागील वर्षाच्या 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर केलेल्या व्हिसाच्या मुलाखतींसाठी सर्व शुल्क पेमेंट फी पेमेंट इनव्हॉइस जारी केल्याच्या तारखेपासून 365 दिवसांसाठी वैध आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्जदारांनी भरलेले शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहील. अर्जदारांनी 30 सप्टेंबर 2023 पूर्वी मुलाखत शेड्युल करणे आवश्यक आहे किंवा मुलाखत माफीचा अर्ज सबमिट करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.
अभ्यास करून व्हिसा दरवाढ
अमेरिकेने निवेदनात पुढे म्हटले आहे की, ते स्थलांतरित आणि बिगर स्थलांतरित प्रवाशांसाठी कायदेशीर प्रवास सुलभ करण्यासाठी वचनबद्ध आहे. फी वाढ नॉन-इमिग्रंट सेवा प्रदान करण्यासाठी घेतलेल्या खर्चावर आधारित आहे. याबाबत अभ्यास केल्यानंतर व्हिसा दरवाढ करण्यात आली आहे. अमेरिकेनं दिलेल्या माहितीनुसार व्हिसा सेवांसह कॉन्सुलर सेवा प्रदान करण्याच्या खर्चाची गणना करण्यासाठी अॅक्टिव्हिटी-बेस्ड कॉस्टिंग (ABC) पद्धत वापरतात.
दरवाढीमुळे प्रभावित झालेल्या व्हिसा श्रेणी खालीलप्रमाणे
- B1: व्यवसाय; घरगुती कर्मचारी किंवा आया - परदेशी राष्ट्रीय नियोक्त्यासोबत असणे आवश्यक आहे
- B2: पर्यटन, सुट्टी
- H: कामाचा व्हिसा
- L: इंट्रा-कंपनी हस्तांतरणकर्ता
- O: विज्ञान, कला, शिक्षण, व्यवसाय किंवा अॅथलेटिक्समध्ये असाधारण क्षमता असलेले परदेशी नागरिक
- P: परफॉर्मिंग ऍथलीट, कलाकार, मनोरंजन करणारे
- Q : आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण पाहुणे
- R : धार्मिक कार्यकर्ते
- E : करार व्यापारी/संधी गुंतवणूकदार
इतर महत्वाच्या बातम्या