न्यूयॉर्क : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेरुसलेमसंदर्भातील निर्णयावरुन संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिका एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण, जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. ट्रम्प यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद अरब देशांसह अन्य देशांमध्ये उमटले होते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. तर इराणमध्येही हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.
त्यामुळे सर्वांचेच लक्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीकडे होतं. त्यानुसार, सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्येही ट्रम्प यांच्या निर्णयावर सदस्य देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी चर्चेने या मुद्द्यावर तोडगा काढायला हवा, असे मतही परिषदेने यावेळी नोंदवलं.
दरम्यान, युरोपियन महासंघानेही जेरूसलेम ही इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांची संयुक्त राजधानी असल्याचा दावा केला आहे. पण अमेरिकेच्या ‘युनो’तील राजदूत निकी हॅली यांनी मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केलं आहे.
संबंधित बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांची जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता
जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2017 08:18 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याबाबत सुरक्षा परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -