लंडन : ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून थेरेसा मे आज जबाबदारी स्वीकारत आहेत. ब्रिटननं युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर युरोपियन युनियनचे समर्थक डेव्हिड कॅमेरुन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.


 
सत्ताधारी हुजूर पक्षाचा नवा नेता म्हणून थेरेसा मे यांची निवड झाल्यावर डेव्हिड कॅमेरुन यांनी पंतप्रधान निवासातून गाशा गुंडाळला. संसदेत निवेदन करुन ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे कॅमेरुन यांनी राजीनामा सोपवला होता.

 
थेरेसा मे क्वीन एलिझाबेथ यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारतील. मार्गारेट थॅचर यांच्यानंतर मे या ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरतील.