UK Political Crisis: ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षात (Conservative Party) बंड सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे सरकारवर संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त केली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी केली आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास 39 मंत्री आणि संसदीय सचिवांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल, वाहतूक मंत्री ग्रँट शॅप्स, संरक्षण मंत्री रिचेल मॅक्लिएन यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ब्रिटनमध्ये राजीनाम्याची लाट
भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल, ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली आहे. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचे म्हटले जात आहे. बोरिस जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठका केल्या आहेत. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदीम जहावी यांना अर्थ खात्याची धुरा देण्यात आली आहे. तर, स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास भारतीय ऋषी सुनक हे पंतप्रधान होऊ शकतात. सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Coronavirus origin : कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरला? अमेरिकेतील तज्ज्ञांचा खळबळजनक दावा