Coronavirus origin : कोरोना महामारीला अडीच वर्षांचा कालावधी उलटलाय. पण अद्याप याच्या उगमस्थानाबद्दल काही समजलेलं नाही. सुरुवातील वटवाघळामार्फत माणसांमध्यो कोरोनाचा शिरकाव झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर चीनमधील वहान लॅबमधून तो पसरल्याचा आरोप करण्यात आला. कोरोना महामारीला अद्याप चीनलाच ग्राह्य धरले जातेय. पण याबाबत नवीन दावा समोर आलाय. कोरोनाचं उगमस्थान चीन अथवा वुहान लॅब नव्हे (Coronavirus Leak from china wuhan lab) असा दावा केला जातोय. जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना विषाणून चीन नव्हे दुसऱ्याच देशात तयार झाल्याचा नवीन दावा समोर आलाय. कोरोनाचं उगमस्थान चीन नव्हे अमेरिकामधील (America) एका लॅबमधून झाल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. 
 
डेली मेलमधील वृत्तानुसार, अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ज्ञ जेफरी सैस यांच्या मते, कोरोना विषाणू हा चीनच्या वुहान लॅबमधून नव्हे तर अमेरिकेच्या बायोटेक्नोलॉजी लॅबमधूनच पसरला आहे. जेफरी सैस यांनी दोन वर्षांपर्यंत कोरोनाच्या उगमस्थानाच्या पथकाचे नेतृत्व केले होते. सैस यांनी याआधीही कोरोना महासाथ चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांमध्ये झालेल्या प्रयोगाचा परिणाम असल्याचं सांगितलं होतं. कोरोनाच्या उगमस्थानावर जागतिक पातळीवर वारंवार चीनला जबाबदार धरुन जाब विचारला जात होता. पण सैस यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. 


जेफरी सैस यांनी स्पेनिश जागतिक थिंक-टँक गेट सेंटरमधील कार्यक्रमात कोरोनाच्या उगमस्थानावर खळबळजनक दावा केलाय. यावेळी बोलताना सैस म्हणाले की, दोन वर्षांपासून लॅन्सेटसच्या कोरोना उगमस्थानाच्या पथकात काम करतोय. मला खात्री आहे की, कोरोना हा यूएस लॅब बायोटेक्नॉलॉजीतून लीक झाला आहे, त्यामुले कोरोना महामारी ही नैसर्गिक असल्याचं म्हणणं चुकीचं आहे. याचा तपास करण्यात यावा, असेही जेफरी यांनी म्हटलेय. 


जेपरी सैस यांच्या दाव्यानंतर चीननेही याचं समर्थन केलेय. तसेच या प्रकरणाचा कायदेशीर तपास व्हावा, अशी मागणी चीनकडून करण्यात आली आहे. चीनमधील सरकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, असे म्हटलेय. दरम्यान, गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस एडनॉम घेब्रियेस यांनीही कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला, याचा तपास व्हावा असे म्हटले होते.