लंडन : इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या वरिष्ठ मंत्री प्रीती पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काळ्या पैशावर टाच आणण्यासाठी हा उत्तम निर्णय असल्याचं प्रीती पटेल यांनी म्हटलं आहे.

प्रीती पटेल या इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय विकास मंत्री आहेत. काळा पैसा ही जागतिक समस्या आहे. काळ्या पैशामुळेच दहशतवादाला बळ मिळत असून अवैध व्यापार वाढत आहेत. त्यामुळे जगाला कडक संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं प्रीती पटेल यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं इंग्लंडकडून स्वागत झालं पाहिजे, असं मत प्रीती पटेल यांनी इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत व्यक्त केलं.