कॅराकस (व्हेनेझुएला) : नोटाबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एकीकडे कौतुक, तर दुसरीकडे टीका होत आहे. आता दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशानंही मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. देशातील सर्वोच्च मूल्याची चलनी नोट नाण्यात बदलण्याचा निर्णय व्हेनेझुएला सरकारने घेतला आहे.


72 तासांच्या आत देशातील सर्व उच्च मुल्याच्या नोटा नाण्यांमध्ये बदलण्याची घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी ही घोषणा केली.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा अन्न आणि इतर गोष्टींच्या तुटवड्यासोबतच तस्करी रोखण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपती मादुरो यांनी व्यक्त केला आहे. तसेच अवैधरित्या परदेशात चलन साठवणाऱ्यांना ते बदलता येऊ नये यासाठी देशाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.