UAE Missile Threat Alert : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आपल्या देशातील नागरिकांना संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याचा (Missile Threat) मोठा इशारा देत तात्काळ जवळच्या सुरक्षित इमारतीमध्ये किंवा आडोशाला जाण्याचे निर्देश दिले आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defence System) देशाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राच्या धोक्याचा शोध घेतल्यानंतर राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NCEMA) ही आणीबाणीची सूचना जारी केली.
यूएईच्या गृहमंत्रालयाने नागरिकांच्या मोबाईलवर पाठवलेल्या अलर्ट संदेशात म्हटले आहे की, "सध्याची परिस्थिती आणि संभाव्य क्षेपणास्त्र धोका लक्षात घेता, नागरिकांनी त्वरित जवळच्या सुरक्षित इमारतीमध्ये आश्रय घ्यावा".
UAE Air Defence System : हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क; धोक्याचा शोध
संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे स्पष्ट केले की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने देशाच्या दिशेने आलेला क्षेपणास्त्र धोका शोधून काढला. गेल्या काही महिन्यांत यूएईमध्ये अशा प्रकारचा तातडीचा अलर्ट जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मे आणि जुलै महिन्यातही असाच इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई संरक्षण दलाने आलेल्या क्षेपणास्त्रांचा यशस्वीपणे हवेतच खात्मा केल्याचे वृत्त असून परिस्थिती आता नियंत्रणात व सुरक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
UAE Citizen Advisory : नागरिकांना अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन
यूएई प्रशासनाने आणि प्राधिकरणाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त शासकीय आणि अधिकृत वाहिन्यांवरून (Official Channels) येणाऱ्या सूचनांचे व अपडेट्सचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण दल पूर्णपणे सज्ज आणि सतर्क असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ही बातमी वाचा:
