दुबई: संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च इस्लामिक संस्था यूएई फतवा परिषदेने करोना लसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश वापरला असेल तरी मुस्लिमांनी त्या लसीचे डोस घेण्यास काही हरकत नाही, असे यूएई फतवा परिषदेने म्हटले आहे. डुकराशी संबंधित उत्पादनांच्या वापराला मुस्लिम समाजात ‘हराम’ समजलं जातं.


संयुक्त अरब अमिरातीच्या इस्लामिक परिषद अर्थात फतवा कौन्सिलने डुक्कराच्या मांसाचा अंश असलेल्या कोरोना लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. या कोरोनाच्या लसीमध्ये पोर्क (डुक्कराचे मांस) च्या जिलेटिनचा वापर करण्यात येणार आहे. डुक्कराचे मांस इस्लाममध्ये निषिध्द मानले जात असतानाही या लसीच्या मुस्लिम नागरिकांवर वापराला मान्यता देण्यात येत आहे.


कोरोनाच्या या लसीत डुक्कराच्या मांसाच्या जिलेटिनचा वापर केला असल्याने युएईतील मुस्लिम नागरिकांची चिंता वाढली होती. इस्लाममध्ये कोणत्याही उत्पादनात पोर्कचा वापर निषिध्द मानला जातो. त्यामुळे या लसीचा वापर करावा का यावर बरीच चर्चा करण्यात आली.


फतवा कौन्सिलच्या या निर्णयाची माहिती देताना अधयक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या म्हणाले की, जर कोणताही पर्याय नसेल तर कोरोना लसीमध्ये डुक्कराच्या मांसाच्या वापराला इस्लामच्या तत्वज्ञानापासून वेगळं ठेवलं पाहिजे. अशा वेळी पहिली प्राथमिकता ही नागरिकांच्या जीवनाचे संरक्षण करण्याची असेल. या पोर्क-जिलेटिनचा वापर खाण्यासाठी न करता औषधांच्या स्वरुपात केला जाणार असल्याने त्याला काही आक्षेप घेण्याचं कारण नाही.


कोरोना व्हायरस हा संपूर्ण मानव समाजाला धोकादायक असल्याने इस्लामचे तत्वज्ञान यापासून दूर ठेऊन मनुष्याचं जीवन वाचवण्याला प्राधान्य दिलं जाईल असा निर्णय फतवा कौन्सिलमध्ये घेण्यात आल्याचं शेख अब्दुल्ला बिन बय्या यांनी स्पष्ट केलंय.


महत्वाच्या बातम्या: