Turkey Earthquake News : सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपात तुर्की अन् सीरिया उद्धवस्त झाले आहेत. या भूकंपाची विदारक दृश्यं समोर आली आहेत. अजूनही तुर्की सावरलेलं नसून चहुकडे मृतदेहांचा खच दिसून येतोय. याठिकाणी शिपिंग कंटेनरच्या क्षेत्रातही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत तुर्की आणि सीरियात सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे मृत्यूचा आकडा 32 हजारांवर जाण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.  भूकंपाच्या धक्क्यानं तुर्की आणि सीरियातील घरं, इमारती पत्त्याच्य बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकलेत. इतक्या मोठ्या नैसर्गिक संकटातही एका नवजात बाळाचा जीव वाचलाय.. म्हणतात ना... देव तारी त्याला कोण मारी... या म्हणीचा प्रत्यय आलाय. ढिगाऱ्याखालून चिमुकलीला वाचवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय... या भूकंपामध्ये त्या चिमुकल्याचे आई आणि वडील यांचा मृत्यू झालाय. पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाळाचा जीव वाचलाय.


भूकंपामुळे तुर्की आणि सीरियात अनेक इमारती पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकजणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात येत आहेत. संपूर्ण सीरिया आणि तुर्कीमध्ये दु:खाचं अन् भीतीचं वातावरण आहे. ढिगाऱ्याखाली नवजात बाळाला वाचवण्यात यश आलेय. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


 ढिगाऱ्याखालून बाळाला वाचवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बचावपथकातील जवान मलब्याखालून बाळाला वाचवत असल्याचं व्हिडीओत दिसतेय. होशांग हसन यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. अल्पवधीतच या व्हिडीओला सोशल मीडियावर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडलाय. होशांग हसन यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ढिगाऱ्याखालून एका गर्भवती महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याचवेळी त्या बाळाचा जन्म झाला. 






हसनच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडलाय. पाच सेकंदाच्या या व्हिडीओला हजारो लोकांन पाहिलेय. 


रस्त्याशेजारील इमारती, घरंही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. 250 हून अधिक इमारती कोसळल्यात. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्याचाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. तुर्की अन् सीरियातील भूकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुर्कीमधील भूकंपाची दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही...