Turkey Syria Rescue Operation : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती फार बिकट आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतरही अद्याप बचावकार्य सुरु आहे. विशेष म्हणजे एकीकडे ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु असताना अनेक चमत्कारही पाहायला मिळत आहेत. ढिगाऱ्याखालून काही जणांना सुखरुप बचावण्यात यश मिळालं आहे. आता पुन्हा एकदा चमत्कार पाहायला मिळाला आहे. भूकंपाच्या 10 दिवसांनंतर तीन जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 295 तास या तिघांची मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली आहे.


भूकंपातील मृतांच्या आकडा 45 हजारांच्या पुढे


तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपामुळे येथील घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. भूकंपामधील मृतांचा आकडा 45 हजारांच्या पुढे गेला आहे. फक्त तुर्कीमध्ये 38 हजार आणि सीरियामध्ये 5 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव पथकाकडून अद्यापही बचाबकार्य सुरु आहे. भूकंपामध्ये सुमारे 80 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 






 


भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरु


6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरु आहे. 


295 तासांनंतर मृत्यूशी झुंज यशस्वी


तसेच, गुरुवारी रात्री उशिरा आणि शुक्रवारी पहाटे एका 14 वर्षीय मुलासह इतर तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. यां तिघाची सुमारे 295 तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरु होती. अद्यापही भूकंपग्रस्त भागात काही ठिकाणी 24 तास शोध आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, सीरियाच्या सीमेजवळील हाते प्रांतात 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर सुमारे 10 दिवसांनी हकन यासिनोग्लू या व्यक्तीला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचवण्यात आलं आहे. 


बचाव कार्यात पथकासमोर अनेक अडथळे


बचाव कार्यात सहभागी असलेल्या पथकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तेथील खराब हवामानामुळे काही ठिकाणी बचावकार्यात अडथळे येत आहेत. भारताने तुर्कीमध्ये एनडीआरएफ टीम आणि वैद्यकीय पथकही पाठवले आहे. यापूर्वी डब्ल्यूएचओने मृतांची संख्या 20,00 असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु सध्या मृतांची संख्या दुप्पट झाली आहे. भूकंपातील मृतांचा आकडा 50,000 हजारांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Turkey Syria Earthquake : भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सध्या अंतिम टप्प्यात