Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपामुळे सुमारे 21,000 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाबाबत भूगर्भशास्त्रज्ञाने आधीच भाकित केलं होतं. त्याचं संशोधकाने आता भारताबद्दलही धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. डच भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी आधीच तुर्की आणि सीरियातील भूकंपाबाबत भाकित केल्याचं सांगितलं जात आहे. 


डच संशोधक आणि भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियातील भूकंपाबद्दल भाकित केलं होतं. हूगरबीट्स यांनी भविष्यवाणी केली होती की, तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप होईल. आता याचं संशोधकाने भारताबद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. भूकंपाच्या यादीत तुर्की आणि सीरियानंतर भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक असल्याचं त्यांनी भाकित केलं आहे. डच भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता आशियाई देशांना भूकंपाचा झटका बसणार आहे. 


तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप


डच संशोधक आणि भूगर्भशास्त्रज्ञ (Frank Hoogerbeets) फ्रँक हूगरबीट्स यांनी भूकंपाबाबत नवीन भाकित केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्रँक हूगरबीट्झ यांनी आणखी एका विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. आशियाई देशांना तुर्कस्तानसारखा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल, असे हूगरबीट्सने म्हटले आहे. त्यांच्या मते, पुढील भूकंप अफगाणिस्तानपासून सुरु होईल आणि अखेरीस पाकिस्तान आणि भारत ओलांडल्यानंतर हिंद महासागरात संपेल.


पाहा व्हायरल व्हिडीओ :






भूकंप होण्याआधीच केली होती भविष्यवाणी


मुहम्मद इब्राहिम नावाच्या एका ट्विटर युजरने माहिती शेअर करत म्हटले आहे की, "डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स ज्यांनी तीन दिवसांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा अंदाज वर्तवला होता, त्यांनी आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानला मोठा भूकंप होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या भूकंपाचा झटका अफगाणिस्तान आणि भारतासह पाकिस्तानलाही बसणार आहे, असा दावा करण्यात येत आहे."


तुर्कीतील भूकंपाबद्दल फ्रँक यांचं भाकित


3 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजे भूकंपाच्या तीन दिवस आधी, नेदरलँड-आधारित सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षणासाठी (SSGS) काम करणार्‍या डच संशोधक फ्रँक हूगरबिट्स यांनी अंदाज वर्तवला होता. डच संशोधक फ्रँक हूगरबीट्सने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "लवकरच किंवा काही दिवसांमध्ये दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन या प्रदेशात 7.5 तीव्रतेचा भूकंप होईल." हूगरबिट्स यांनी हे भाकित केल्यानंतर तीन दिवसांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Turkey Earthquake : तुर्कीमधील भूकंपाबाबत तीन दिवसांपूर्वीच वर्तवली होती भविष्यवाणी, पण...