नवी दिल्ली: तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये फुटबॉल मैदानाबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटात २९ जणांचा मृत्यू झाला असून, 166 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसांचा समावेश आहे.


बेसिक्टस मैदानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनात हे स्फोट झाले. सुसाईड बॉम्बरद्वारे हे स्फोट घडवून आणले गेल्याचं तपास अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

तसेच या स्फोटानंतर हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेनं फायरिंग केल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळते आहे. त्यामुळं पोलिसांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्फोट घडवले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.

दरम्यान, मैदानात रात्री सॉकरची मॅच संपल्यानंतर हे स्फोट घडवण्यात आले. त्यामुळं हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे.