अंदमान-निकोबारमध्ये अडकलेल्या सर्व 2,376 प्रवाशांची सुखरुप सुटका
एबीपी माझा वेब टीम | 10 Dec 2016 09:09 AM (IST)
पोर्टब्लेअर: चक्रीवादळामुळं अंदमान इथं अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. २,३७६ प्रवाशी गेल्या काही दिवसांपासून अडकून पडले होते. ज्यात महाराष्ट्रातल्याही 50 हून अधिक लोकांचा समावेश होता. पोर्टब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या नील बेटावर 5 डिसेंबरला अचानक पाऊस आणि वादळ सुरु झालं होतं. ज्यामुळे हवाई आणि जलवाहूतक थांबवण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी हवामानात थोडा बदल झाल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सर्व पर्यटकांची सुटका केली. एमआय 17 व्ही-5 मिलिटरी ट्रांसपोर्ट हेलिकॉप्टर, तीन पवन हंस हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या सात नौवकांनी पर्यटकांची सुटका केली. सर्व पर्यटकांच्या सुटकेनंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.