मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी तालुक्यातील वडवली गावाजवळ ऑईल टँकरला अपघात, भीषण आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली


--------------------------------------

औरंगाबाद: मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मुखमंत्र्यांची पैठणमधील सभा उधळण्याचा छावा संघटनेचा प्रयत्न, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

---------------------------------------

यवतमाळ: बाभूळगावच्या बस स्थानकावर तरुणाची दिवसाढवळ्या हत्या, गणेश मेश्राम असे मृत तरुणाचे नाव

-------------------------------------

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर बोराघाटात अपघात, टेम्पोला कंटेनरची मागून धडक बसल्याने टेम्पो चालक जागीच ठार

----------------------------------------

  1. विजय चौधरीनं सलग तिसऱ्यांदा पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा, पुण्याच्या अभिजित कटकेचा 2-0नं पराभव

  2. तुर्कीच्या इस्ताम्बुलमध्ये फुटबॉल स्टेडियमबाहेर स्फोट, 15 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज, सुसाईड बॉम्बरकडून पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न.

  3. कर्नाटकात बाथरुमच्या टाईल्समागे कुबेराचा खजिना, हवाला व्यापाऱ्यावर आयकरचा छापा, तर वेल्लोर, मुंबई आणि पुण्यातही नव्या-जुन्या नोटा जप्त

  4. तीन दिवसाच्या सलगच्या सुट्यांमुळं एटीएमबाहेर भल्यामोठ्या रांगा, रेल्वे आणि बससाठी 500च्या जुन्या नोटांचा वापरही बंद

  5. नवी मुंबईत शाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उजेडात, आरोपी शिक्षक फरार

  6. बारामतीत नगरपालिकेच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं थेट शरद पवारांना आव्हान, बारामतीत राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा

  7. संसदेत बोलू देत नाहीत, म्हणून सभांमधून बोलतो, गुजरातच्या सभेत मोदींचा विरोधकांवर घणाघात, मोदींच्या हस्ते बनास दूधाच्या प्रकल्पाचं उद्घाटन

  8. मुंबई कसोटीत मुरली विजयपाठोपाठ विराट कोहीलीचा शतकी धमाका, तिसऱ्या दिवसअखेर भारताला इंग्लंडवर 51 धावांची आघाडी