Cheapest Foreign Trip: पैशांमुळे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये तुम्ही जगातील अनेक देशांना भेट देऊ शकता आणि हे क्षण आयुष्यभर तुमच्या मनात साठवू शकता. असे अनेक देश आहेत जिथे प्रवास करणे खूप स्वस्त आहे. तुम्ही फक्त 30,000 रुपयांमध्ये सर्वात स्वस्त परदेशी सहल (Foreign Trip) पूर्ण करू शकता. चला तुम्हाला जगातील अशा देशांबद्दल सांगतो जिथे भारतातून जाणं खूप स्वस्त आणि चांगलं आहे.


नेपाळ (Nepal)


हा एक अतिशय सुंदर देश आहे. आजूबाजूचे पर्वत, मंदिरं आणि संस्कृती तुम्हाला आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे. येथे येऊन तुम्ही काठमांडू, पोखरा, नगरकोट येथे फिरू शकता. नेपाळच्या राउंड ट्रिपची किंमत सुमारे 10,000 रुपये आहे. नेपाळमध्ये राहण्यासाठी स्वस्त हॉटेल आणि डॉर्म उपलब्ध आहे. स्ट्रीट फूड आणि मोठ्या कॅफेमध्ये तुम्ही नेपाळी डिशचा आनंद घेऊ शकता. प्रेक्षणीय स्थळं पाहण्यापासून ते साहसी उपक्रमांपर्यंतचा संपूर्ण खर्च 30,000 रुपयांच्या आत पूर्ण होतो.


श्रीलंका (Sri Lanka)


श्रीलंकेच्या सौंदर्याबद्दल काय म्हणावं... या देशाला नैसर्गिक सौंदर्याचा वारसा लाभला आहे. श्रीलंकेला जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम कोलंबोला जावं. जिथे तुम्हाला मंदिर, पार्क, बीच, म्युझियमला ​​भेट देण्याची संधी मिळेल. येथील नाईट लाइफ खूप प्रसिद्ध आहे, श्रीलंकेचं जेवण देखील खूप स्वस्त आणि स्वादिष्ट आहे. भारत ते कोलंबोचं टू वे तिकीट 16 ते 17 हजारांना मिळेल. प्रति दिन हॉटेलचे भाडे 1 हजारापर्यंत जाते. टॅक्सी आणि उर्वरित खर्चासह तुम्ही 30 हजारांमध्ये श्रीलंकेची सहल पूर्ण करू शकता.


भूतान (Bhutan)


स्वस्त परदेशी सहलींमध्ये भूतानचेही नाव येते. हा एक छोटा आणि सुंदर देश आहे. येथील वाद्यं आणि सौंदर्य तुमची सहल आणखी अविस्मरणीय बनवेल. पारो हे भूतानमधील सर्वात सुंदर शहर आहे. प्राचीन वास्तू आणि हिरवेगार निसर्ग पर्यटकांना त्यांच्या पद्धतीने आकर्षित करतात. तुम्ही ट्रेन किंवा फ्लाइटने भूतानला जाऊ शकता. तुम्ही कोलकाता ते हसिमारा ट्रेनने प्रवास सुरू करू शकता. तेथून जीपने थेट भूतानला पोहोचता येतं. भूतानचा राहण्या-खाण्यासह संपूर्ण खर्च 30,000 रुपयांपर्यंत जातो.


म्यानमार (Myanmar)


भारताच्या अगदी शेजारी वसलेला म्यानमार हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. येथे तुम्ही 30,000 रुपयांमध्ये अगदी आरामात फिरू शकता. बागान, मंडाले, इनले आणि यंगून ही या देशातील ठिकाणं आहेत जिथे तुम्ही भेट दिलीच पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्ही भारताच्या पूर्व भागात असाल तर तुम्ही या ठिकाणी रस्त्यानेही जाऊ शकता. भारतीय लोकांना म्यानमारला भेट देण्यासाठी २४ तासांच्या आत ई-व्हिसा मिळतो. यासोबतच या देशात भारतीय लोकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधाही देण्यात आली आहे.


हेही वाचा:


झोपेत झटके का लागतात? उंचावरून पडत असल्याचा आभास का होतो? 'हे' आहे त्यामागचं कारण