इस्लामाबाद : पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान आज दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळलं आहे. या विमानात 47 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी 3.30 नंतर हे विमान रडारच्या कक्षेबाहेर जात एबोटाबादजवळ कोसळलं आहे.

पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पिपलियान गावाजवळ कोसळलं आहे. हे विमान चित्रालहून इस्लामाबादला जात होतं. चित्रालहून दुपारी 3.30 वाजता उड्डाण केल्यानंतर हे विमान गायब झालं होतं. त्यानंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही संपर्क तुटला.

https://twitter.com/Danyal_Gilani/status/806471068445765632

पाकिस्तान एअरलाईन्सचं हे विमान का कोसळलं याचा शोध घेतला जात आहे. तसंच अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांना शोधण्याचं कामही सुरु करण्यात आलं आहे.