स्वराज म्हणाल्या की, "पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेले दहशतवादी भारतावर मोठे हल्ले करण्याची तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताला स्वतःहून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणे गरजेचे होते."
व्हिडीओ पाहा
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज चीनमध्ये रशिया भारत आणि चीनच्या (आरआयसी)परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याचवेळी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला का केला याबाबतची कारणे स्वराज यांनी स्पष्ट केली.
व्हिडीओ पाहा