बँकॉक: थांयलडची स्टार युट्यूबर (YouTube) नथामोन खोंगचाक (Natthamon Khongchak) उर्फ नट्टी द युट्यूबरने (Nutty the YouTuber) तिच्या चाहत्यांना 575 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. आपल्या प्रसिद्धाचा फायदा घेत या युट्यूबरने कमी वेळात मोठा परतावा देतो असं आश्वासन देत हजारो चाहत्यांना फसवलं (Forex Scam) आणि तिने पैसा घेऊन पोबारा केला असल्याचं समोर आलं. या गोष्टीचा फटका तब्बत 6000 चाहत्यांना बसला आहे.
नथामोन खोंगचाक (Natthamon Khongchak) उर्फ नट्टी द युट्यूबर (Nutty the YouTuber) ही थायलंडमधील (Thailand) सोशल मीडियातील इन्फ्लुएंसर असून युट्यूबवर तिचे जवळपास आठ लाख फॉलोअर्स आहेत. याच प्रसिद्धीचा फायदा घेऊन तिने अनेकांना गंडा घातला आहे. पाच महिन्यांपूर्वी तिने तिच्या चाहत्यांना कमी कालावधीत जास्त पैसा कमावण्यासाठी तिच्याकडे काही स्कीम असल्याचं सांगितलं. या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर चाहत्यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावं असंही आवाहन तिने केलं.
नट्टी द युट्यूबर तिच्या चाहत्यांना पैसा कमावण्याच्या तीन स्कीम्स सांगितल्या. त्यामध्ये तीन महिन्यात 25 टक्के परतावा, सहा महिन्यात 30 टक्के आणि एका वर्षात 35 टक्के परतावा देण्याचं आश्वासन दिलं. नट्टी द युट्यूबरची प्रसिद्धीच एवढी आहे की तिच्या सांगण्यावर लोकांनी लगेच विश्वास ठेवला. यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील असं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे एप्रिलपर्यंत पैसे मिळतही होते. पण त्यानंतर मात्र कुणालाही पैसा मिळाला नाही. त्यासंबंधी अनेकांनी तक्रारी केल्या. नथामोन खोंगचाकने केलेल्या या घोटाळ्याचा फटका तब्बल 6000 चाहत्यांना बसला आहे.
मे महिन्यात तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आणि चाहत्यांनी गुंतवलेला सर्व पैसा बुडाला असं सांगितलं. ट्रेडिंग करताना आपली चूक झाली आणि सर्व पैसा बुडाल्याची कबुली दिली. त्याचवेळी सर्वांचे पैसे आपण परत करणार असल्याचंही तिने आश्वासन दिलं. त्यानंतर जूनमध्ये तिने आपण दोन केसेसमध्ये फसल्याचं सांगत आपण जेलमध्ये गेल्यास पैसे परत करु शकणार नसल्याचं सांगितलं.
नथामोन खोंगचाक हिने काही महिन्यांपूर्वी (Nutty’s Diary) या नावाने आपला शेवटचा युट्यूब व्हिडीओ शेअर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :