अमेरिकेतील टेक्सासच्या मॉलमध्ये गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, तीन संशयित ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 04 Aug 2019 09:22 AM (IST)
टेक्सासचे लेफ्टनंट गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी सांगितले की, या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हा मॉल आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे. लोकांना या घटनास्थळाकडे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अल पासो: अमेरिकेतील टेक्सासमधील शॉपिंगमधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता ही घटना घडली. वालमार्टच्या मॉलमध्ये ही घटना घडली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. टेक्सासचे लेफ्टनंट गव्हर्नर डॅन पॅट्रिक यांनी सांगितले की, या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर हा मॉल आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जात आहे. लोकांना या घटनास्थळाकडे येण्यास बंदी घालण्यात आली आहे. टेक्सासमधील या दुर्दैवी घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केले आहे. टेक्सासमधील गोळीबार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यात 20 लोकांचा मृत्यू ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.