आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात सुषमा स्वराज पाकिस्तानवर 6 मिनिटे बोलल्या. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत स्वराज यांचं स्वागत केलं.
सुषमा स्वराज म्हणाल्या की, पाकिस्तानने आम्हाला मानवाधिकाराबद्दल शिकवू नये. कारण पाकिस्तानने स्वत: क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानने स्वत: आत्मचिंतन केलं पाहिजे.
पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, एकीकडे भारताला सर्व जगाकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती म्हणून गौरवलं जातं. तर दुसरीकडे पाकिस्तानची ओळख दहशतवाद्यांचा कारखाना म्हणून होते.
त्या पुढे म्हणाल्या की, भारताने आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या संस्था उभारल्या. पाकिस्तानाने एलईटी, जेईएम, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि हक्कानी सारख्या दहशतवादी संघटनांच्या गटांना नेहमी पोसलं आहे.
विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी चीनलाही चांगलंच फटकारलं आहे. अजहर मसूदच्या मुद्द्यावरुन बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, दहशतवाद हा मानवी अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे त्याला कोणीही योग्य ठरवू शकत नाही.
काय म्हणाल्या सुषमा स्वराज ?
संबंधित बातम्या
पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, भारताचा UN मध्ये पलटवार