Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटासह मोठा राजकीय भूकंपही आला आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) सिंगापूरला पळाले, त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी साजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) यांचं नाव चर्चेत आहे. साजिथ प्रेमदासा यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितलं आहे की, ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सामील आहेत.
साजिथ प्रेमदासा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी साजिथ प्रेमदासा यांच्या नावावर एकमत झालं आहे. साजिथ प्रेमदासा यांनी सांगितलं आहे की, सर्वसाधारणपणे श्रीलंकेची जनता राष्ट्रपती निवडते. पण यावेळी संसदेतील 225 सदस्य राष्ट्रपतींची निवड करणार आहेत.
साजिथ प्रेमदासा होणार नवे राष्ट्रपती?
श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांनी पुढे सांगितलं की, आजपर्यंत 225 पैकी दोन तृतीयांश खासदार गोटाबाया राजपक्षे यांना पाठिंबा दिला होता. अशा स्थितीत निवडणूक अवघड असली तरी मी निवडणूक लढणार आहे. रनिल विक्रमसिंघे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण रानिल विक्रमसिंघे हे गोटाबाया राजपक्षे यांच्या जवळचे आहेत आणि जनता राजपक्षेंच्या विरोधात आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या आपत्तीच्या काळात श्रीलंकेला आर्थिक संकटावेळी खूप मदत केली आहे, आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहोत, असंही सजीथ प्रेमदासा यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेला यावेळी भारत सरकार आणि भारतातील लोकांच्या पाठिंब्याची गरज असल्याने त्यांनी आपला पाठिंबा सुरू ठेवण्याचे आवाहन केलं आहे. आर्थिक संकट आणि जोरदार निदर्शनांदरम्यान गोटाबाया राजपक्षे सिंगापूरला पळून गेले आहेत आणि त्यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेतीव परिस्थिती अत्यंत वाईट
सजिथ प्रेमदासा यांनी सांगितलं की, 'मी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी यावर सर्व विरोधकांचं एकमत आहे, मी त्यासाठी तयार आहे आणि बघू काय होतं ते. श्रीलंका सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. आर्थिक अडचणी आहेत, कर्जात बुडलेले आहेत. गरज आणि मूलभूत गोष्टी देशात मिळत नाहीत. अशा परिस्थितीत मी आंतरराष्ट्रीय समुदायाला श्रीलंकेला मदत करण्याचे आवाहन करेन.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Sri Lanka Crisis : राजपक्षे बंधूना देश सोडण्यास मनाई, गोटाबाया यांच्या पलायनानंतर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या नागरिकांचं राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो सेशन, राष्ट्रपती निवासात संतप्त जनतेचा धुडगूस
- Sri Lanka Crisis : गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारला, श्रीलंकेला कधी मिळणार नवे राष्ट्रपती? सभापतींनी सांगितले..