बार्सेलोना : कोरोना विषाणू संसर्गामुळे जवळपास संपूर्ण जग थांबलंय. प्रत्येकजण कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. काही देशांचे अपवाद वगळता आज प्रत्येकजण लॉकडाऊन वाढवताना दिसत आहे. मात्र, असं असतानाच आता काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तिथलं जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. करोनाने थैमान घातलेल्या स्पेनमध्येही अनेक सेवा टप्प्याटप्प्यात सुरु करण्यात येत आहेत. स्पेनमध्ये नुकतचं एक ओपेरा हाऊस जवळजवळ तीन महिन्यानंतर सुरू करण्यात आलं. मात्र, या ओपेरा हाऊसमध्ये पार पडलेल्या पहिल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांऐवजी खुर्च्यावर चक्क झाडं ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
चीनमधून युरोपीयन देशांमध्ये परसलेल्या करोनाने इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये मोठं थैमान घातलं. लॉकडाऊनमुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यामधून बाहेर येण्यासाठी या देशांनी काही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर स्पेनमधील बार्सेलोना येथील ओपेरा हाऊसही सुरू करण्यात आलं. या ओपेरा हाऊसमध्ये करोना लॉकडाऊननंतरचा पहिला कार्यक्रम खास झाडांसाठी ठेवण्यात आला होता. संपूर्ण ओपेरा हाऊसमधील प्रत्येक खुर्चीवर एक याप्रमाणे 2292 कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या.
युजेनियो आम्पुडिया यांनी यावेळी सादरीकरण केलं. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक पक्षी गाताना मला दिसले. या कालावधीत माझ्या गार्डनमधील झाडांची वाढही जोमाने होत असल्याचं लक्षात आलं. त्यामधूनच मी हा पहिला शो केवळ झाडांसाठी करण्याचा निर्णय घेतल्याचे युजेनियो यांनी सांगितले.
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी
जगात कोरोनाचं थैमान सुरुचं
जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरातील प्रत्येक देशात आपले हातपाय पसरले आहेत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 93 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार लाख 78 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 66 टक्के रुग्ण फक्त 10 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 62 लाखांहून अधिक आहे.
ICSE Board Exam Cancelled | आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द