Coronavirus World Update | जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरातील प्रत्येक देशात आपले हातपाय पसरले आहेत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 93 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार लाख 78 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 66 टक्के रुग्ण फक्त 10 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 62 लाखांहून अधिक आहे.

जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?

जगभरातील इतर देशांपैकी कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 24 लाखांहून अधिक लोक आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. तर एक लाख 23 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढताच आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये 35,991 रुग्ण आढळून आले आहेत. तर 863 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 40,131 रुग्ण आढळून आले असून 1,364 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

अमेरिका एकूण रुग्ण : 2,424,144 एकूण मृत्यू : 123,473
ब्राझील एकूण रुग्ण : 1,151,479 एकूण मृत्यू : 52,771
रशिया एकूण रुग्ण : 599,705 एकूण मृत्यू : 8,359
भारत एकूण रुग्ण : 456,062 एकूण मृत्यू : 14,483
यूके एकूण रुग्ण : 306,210 एकूण मृत्यू : 42,927
स्पेन एकूण रुग्ण : 293,832 एकूण मृत्यू : 28,325
पेरू एकूण रुग्ण : 260,810 एकूण मृत्यू : 8,404
चिली एकूण रुग्ण : 250,767 एकूण मृत्यू : 4,505
इटली एकूण रुग्ण : 238,833 एकूण मृत्यू : 34,675
इराण एकूण रुग्ण : 209,970 एकूण मृत्यू : 9,863
पाहा व्हिडीओ : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत गोष्टी लपवत आहेत : कुमार केतकर | विशेष मुलाखत

10 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, भारत, पेरू, चिली, इटली, इराणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त नऊ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन टॉ-20 कोरोना बाधित देशांच्या यादितून बाहेर पडला असून भारताचा समावेश टॉप-4 कोरोना बाधित देशांच्या यादित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

'आपण धोकादायक टप्प्यावर, कोरोना अत्यंत वेगाने पसरतोय' : WHO

मलाला झाली ऑक्सफोर्डमधून पदवीधर, प्रियांकाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा