वॉशिंग्टन : अमेरिकन संसद भवन कॅपिटल हिल्सवर 6 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. बुधवारी सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने देखील ट्रम्प यांच्या अकाऊंट वर कायमची बंदी घातली. ट्रम्प यांच्याविरोधातील निषेध लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतल्याचे स्नॅपचॅटने सांगितले. अखेरच्या दिवशी ट्रम्पविरूद्ध महाभियोग प्रस्तावही मंजूर झाला आहे. रिपब्लिकनच्या 10 सभासदांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे.


अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्ता हस्तांतरण कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प अधिक अशांतता निर्माण करण्यासाठी आपल्या खात्याचा वापर करू शकतील अशी भीती स्नॅपचॅटला होती. त्यामुळे त्यांच्या खात्यावर कायमची बंदी घालण्यात आली. गेल्या आठवड्यात स्नॅपचॅटने ट्रम्प यांचे खाते अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते.


फेसबुक, ट्विटर अन् यूट्यूबकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी


अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल अकाऊंटवर एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. या बंदीमागे हिंसाचार पसरण्याची शक्यता व्हिडिओ प्लॅटफॉर्मने वर्तवली आहे. यूट्यूबने म्हटले आहे की त्यांच्याद्वारे पोस्ट केलेले काहीही हिंसाचाराची आग भडकवू शकते. यापूर्वी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते कायमचे निलंबित केले होते.


महाभियोगाचा प्रस्ताव पारित होणारे ट्रम्प तिसरे राष्ट्राध्यक्ष, बाकीचे दोन कोण आहेत?


डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार
अमेरिकेच्या संसदेत (US Capitol) समर्थकांनी घातलेल्या गोंधळाप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार आहे. महाभियोग प्रस्तावावर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज मतदान झाले. सभागृहात 215 पेक्षा अधिक डेमोक्रेट आणि 5 रिपब्लिकन खासदारांनी याला समर्थन दिले आहे. महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज होती.