World Coronavirus Update : जगभरात अजूनही कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7 लाख 18 हजार 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 15 हजार 976 लोकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 9 कोटी 27 लाख 22 हजार 555 हूंन अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
जगभरात वेगाने पसरणारा कोराना अजूनही चिंतेची विषय आहे. असं असलं तरी बहुतेक देशांच्या दैनंदिन आकडेवारीमध्ये घट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत मृत्यूच्या एकूण संख्येतही घट झाली आहे. या व्यतिरिक्त कोरोनाच्या रिकवरी रेटमध्ये देखील सुधारणा झाली आहे.
गेल्या 24 तासांत भारतात 17 हजार 15 नवे रुग्ण
कोविड-19 इंडियाच्या वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत भारतात एकूण 17 हजार 15 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात 3556, कर्नाटकात 746, दिल्लीत 357, उत्तर प्रदेशात 446 आणि पश्चिम बंगालमध्ये 723 अशा नवीन आकडेवारी समोर आली आहे. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील सर्वाधिक 70 लोकांचा मृत्यू. याशिवाय केरळमधील 26, दिल्लीत 11, पश्चिम बंगालमध्ये 18 आणि छत्तीसगडमध्ये 15 लोकांचे मृत्यू झाले आहेत. तर भारतात 2 लाख 10 हजार 459 लोक अजूनही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा कहर
वर्ल्डमिटर वेबसाइटनुसार, गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोनाचे 2 लाख 16 हजार 138 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर अमेरिकेत एकूण 2 कोटी 35 लाख 93 हजार 741 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोनामुळे 3,722 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.
ब्राझील आणि रुसची आकडेवारी काय सांगते?
ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 61 हजार 822 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 1 हजाप 283 लोकांचा मृत्यू झाला आहे. रुसमध्ये गेल्या 24 तासांत 22 हजार 850 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 566 लोकांचा मृत्यू झाला आहे.