इस्लामाबाद : पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये थेट पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. इतकंच नाही तर पाकिस्तानकडून आमच्या भागात अत्याचार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमध्येही पाकिस्तानविरोधात आगपाखड करण्यात आली आहे.

 

पाकिस्तानी नागरिकांनीच पाकविरोधी घोषणाबाजी केली. महत्त्वाचं म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचं ठणकावून सांगितलं होतं. तसंच पाकिस्तानने स्वत:च्या देशातील बलुचिस्तानमध्ये नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत उत्तर द्यावं, असंही म्हटलं होतं.

 

त्यानंतर आज पाकिस्तानात चलबिचल पाहायला मिळत आहे. पाकिस्तान आमच्यावर अत्याचार करतं, असा आरोप बलुचिस्तानमधील नागरिकांनी केला आहे.  तसंच एका स्थानिक बड्या नेत्यानंही या प्रश्नी भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

 

त्यामुळे काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या प्रश्नी भारताला सल्ले देणाऱ्या पाक सरकारवर चांगलीच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

 

पाकिस्तानातील मोठा प्रांत

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान प्रांताने पाकिस्तानचा 48 % भूभाग व्यापला आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. या प्रदेशात राहणाऱ्या बलोच जमातींमुळे या प्रदेशाचे नाव बालुचिस्तान ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातमी


पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचाच भाग, मोदींनी खडसावलं