न्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न राहता जगभर साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.





आपल्या 'जाणता राजा'ला अभिवादन करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीत तेथील भारतीय जमले होते. या कार्यक्रमाला सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सिनेटचे सदस्य केविन थॉमस यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. अमेरिकेतील शेकडो भारतीय या कार्यक्रमासाठी जमले होते.





डेप्युटी कौन्सिल जनरल शत्रुघ्न सिन्हा यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं.



केविन यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. तसेच शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना सिनेटर केविन थॉमस यांनी व्यक्त केली.


It was an honor to pay tribute to Shivaji Maharaj. https://t.co/0Mkvytv9vS





बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुखनेही व्हिडीओ मेसेजद्वारे शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.





'सैराट' सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागराज मंजुळे यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित केलं. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील हॉलमध्ये शेकडो शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.





शिवजयंतीनिमित्त सव्वा लाख चौरस फुटांची महारांगोळी, शिवराज्याभिषेक साकारला



पाहा व्हिडीओ - नरवीर तानाजी मालुसरेंची मूळ समाधी