दि हेग : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. कुलभूषण जाधव कथित हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. आज भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली बाजू मांडतील.


पाकिस्तानच्या न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आतंरराष्ट्रीय न्यायालयाने 18 मे 2017 रोजी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.


आजपासून दि हेगमध्ये या प्रकरणावर सुनवणी होणार आहे. 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीदरम्यान ही सुनावणी होणार आहे. भारताकडून ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीश साळवे आतंरराष्ट्रीय न्यायालयात भारताकडू बाजू मांडतील. 19 फेब्रुवारीला खावर कुरेशी पाकिस्तानकडून बाजू मांडतील.


त्यानंतर भारत 20 फेब्रुवारीला आपलं उत्तर देईल. त्यानंतर 21 फेब्रुवारील अखेरची सुनावणी पार पडेल. त्यानंतर एक-दोन महिन्यांनंतर या प्रकरणावर निकाल येणं अपेक्षित आहे.


संबंधित बातम्या :

आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ


जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं?


‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार


पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न


टिकली-बांगड्या उतरवल्या, मराठीतही बोलू दिलं नाही


कुलभूषण यांच्या आई, पत्नी भारतात, सुषमा स्वराज यांच्याशी भेट


कान, डोक्यावर जखमांचे निशाण, पाकिस्तानकडून जाधवांचा छळ?


 

पाहा व्हिडीओ