न्यूयॉर्क : अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेला. न्यूयॉर्क येथील 'छत्रपती फाऊंडेशन'ने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.


गेल्या दोन वर्षांपासून 'छत्रपती फाऊंडेशन'ने न्यूयॉर्क येथे शिवजयंती साजरी करायला सुरूवात केली आहे. यावर्षीही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या टाईम्स स्क्वेअर इथे भगवे फेटेधारी शिवभक्त आणि मुला-मुलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये मराठी माणसांसह देशातील इतर राज्यातील भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य आणि विचारांची ओळख व्हावी, म्हणून 'छत्रपती फाऊंडेशन'कडून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षी जगातील एकूण 45 देशांमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होत आहे. अमेरिकेसह जर्मनी, इंग्लंड, रशिया,  चीन, जपान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीय-आशियाई देशांचा यामध्ये समावेश आहे.

संबंधित बातम्या :

राज्यासह देश-विदेशात शिवजयंतीचा उत्साह


मराठीतून ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिवरायांना नमन