डॉन न्यूजच्या मते, पंजाब सरकारनं सईद आणि त्याचा साथीदार काझी काशिफला दहशतवाद विरोधी कायद्याच्या (एटीए) चौथ्या यादीत टाकलं आहे. या यादीत अब्दुल्ला ओबैद, जाफर इकबाल, अब्दुर रहमान आबिद या तिघांची नावंही टाकण्यात आली आहेत.
30 जानेवारी 2017 पासून हाफिज सईद नजर कैदेत आहे. 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सईदला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण 2009 साली कोर्टानं त्याची सुटका केली होती.
पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयानं दशतवाद विरोधी विभागाला या लोकांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चौथ्या यादीत सईद नाव समाविष्ट करणं ही गोष्ट हे सिद्ध करते की, त्याचा कोणत्या तरी दहशतवादी कारवाईशी संबंध आहे.
या यादीत नाव आल्यानं सईदच्या परदेशी प्रवासावर प्रतिबंध येऊ शकतो. तसेच त्याच्या संपत्तीचीही चौकशी होऊ शकते. तसेच याचं उल्लंघन केल्यास 3 वर्ष शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.
संबंधित बातम्या:
26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद नजरकैदेत
हाफिज सईद पाण्यामार्गे भारतात हल्ला करण्याच्या तयारीत