कोल्हापूर : रशियाजवळ कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांना लागलेल्या भीषण आगीत 14 खलाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन भारतीयांसह नऊ जण बेपत्ता आहेत. ऋषिकेष सकपाळ आणि कोल्हापूरच्या अक्षय जाधव यांचा शोध सुरु आहे.
अपघातग्रस्त झालेल्या एका जहाजावर 17 खलाशी होते. यामध्ये तुर्कस्तानच्या नऊ, तर भारताच्या आठ खलाशांचा समावेश होता. दुसऱ्या जहाजावर 15 खलाशी होते. यामध्ये तुर्कस्तानचे सात आणि भारताचे सात खलाशी होते. बेपत्ता खलाशांमध्ये महाराष्ट्रातील दोघं जण आहेत.
कोल्हापूरच्या कोडोली गावचा अक्षय बबन जाधव बेपत्ता आहे. रशियन पाणबुडे बेपत्ता खलाशांचा शोध घेत आहेत. आग लागलेली दोन्ही जहाजे टांझानिया देशाच्या मालकीची आहेत.
एका जहाजात 'लिक्वीफाईड नॅचरल गॅस' (एलएनजी) होता, तर दुसऱ्यामध्ये टँकर्स होते. एका जहाजातून मालवाहू टाकीमध्ये गॅस भरत असताना अचानक मोठा स्फोट झाला. काही क्षणात दोन्ही जहाजांना भीषण आग लागली.
अपघातानंतर 35 खलाशांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी 12 जणांना वाचवण्यात आलं, तर 14 जणांना प्राण गमवावे लागले. नऊ जण मात्र अद्यापही बेपत्ता आहेत.
रशियाजवळ समुद्रात जहाजांना आग, दोघा भारतीयांसह नऊ खलाशी बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jan 2019 06:10 PM (IST)
रशियातील समुद्रात मालवाहू जहाजांनी पेट घेतल्यानंतर 35 खलाशांनी समुद्रात उडी घेतली. यापैकी 12 जणांना वाचवण्यात आलं, तर 14 जणांना प्राण गमवावे लागले. नऊ जण मात्र अद्यापही बेपत्ता आहेत.
फोटो : बेपत्ता खलाशी अक्षय जाधव
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -