पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या चर्चेनंतर भारत आणि इस्रायल यांच्यात सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये हवाई संरक्षण, अंतराळ, कृषी आणि संरक्षण क्षेत्रातील करारांचा समावेश आहे. तर गंगा नदीच्या स्वच्छतेसाठीही इस्रायलसोबत करार करण्यात आला आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यातील 7 करार कोणते?
- औद्योगिक संशोधन-विकास आणि निधीसंदर्भात सहकार्य
- जलसंधारण
- स्टेट वॉटर यूटिलिटी रिफॉर्म
- कृषी क्षेत्र
- आण्विक क्षेत्र
- जीईओ-एलईओ ऑप्टिकल लिंक सहकार्य
- अंतराळ क्षेत्र