मुंबई : अंतराळात (Space) अनेक रहस्य दडलेली आहेत, असं म्हटलं जातं. म्हणूनच जगभरातील (World) जवळजवळ सर्वच देश अंतराळ संशोधन (Space Research) करताना दिसत आहे. अनेक देशांनी विविध ग्रहांवर अंतराळ मोहिमा (Space Mission) केल्या आहेत, तर काही देश भविष्यातील अंतराळ मोहिमांची तयारी करत आहेत. आता ब्रिटनमधील (UK) शास्त्रज्ञांनी (Scientists) पृथ्वीवरच (Earth) मंगळ (Mars) ग्रह तयार केला आहे. 


शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर बनवला कृत्रिम मंगळ ग्रह


ब्रिटन देशही अंतराळ संशोधनात मागे नाहीय. ब्रिटनकडून आगामी मंगळ मोहिमेसाठी जोरदारप तयारी सुरु आहे. त्यासाठी ब्रिटनने पृथ्वीवरच मंगळ ग्रह बनवला आहे. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एका शहरात मंगळ ग्रहाप्रमाणे वातावरण तयार केलं आहे. ब्रिटनच्या आगामी महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेसाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. 2028 मध्ये ब्रिटनची मंगळ मोहिम पार पडणार आहे. त्यासाठी ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच मंगळ ग्रहासारखं वातावरण तयार केलं आहे.


चार वर्षानंतर राबवणार 'मिशन मंगल'


ब्रिटन मंगळ ग्रहावर जाण्याची मोहिम आखत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टीवनेज यांनी मंगळ ग्रह निर्माण केला आहे. ब्रिटनने एका शहराला मंगळ ग्रह बनवलं आहे. या शहरातील शेकडो एकर जमिनीवर मंगळ ग्रहासारखं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. या कृत्रिम मंगळ ग्रहावर शास्त्रज्ञांचं पथक संशोधन करत आहे. याला कृत्रिम मंगळ ग्रह असंही म्हणता येईल.


ब्रिटनची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिम


ब्रिटनची अंतराळ संस्था मंगळ मोहिम आखत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका शहराचंच रुपांतर मंगळ ग्रहामध्ये केलं आहे. तेथील लाल माती आणि इतर परिस्थितीत प्रमाणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रज्ञांनी रोव्हर तयार केला असून त्याचीही चाचणी या कृत्रिम मंगळ ग्रहावर त्याची चाचणी करण्यात येणार आहे. 


ब्रिटनने हर्टफोर्डशायर शहरचं बनवलं मंगळ


फ्रेंच दिग्गज एरोस्पेस  एअरबसने आपल्या एक्सोमार्स रोव्हरची चाचणी घेण्यासाठी हर्टफोर्डशायर शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये 22.5 दशलक्ष किमी अंतरावरील मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाप्रमाणे परिस्थिती तयार करण्यासाठी लाल वाळू आणि खडकांचा वापर केला आहे. ब्रिटनचं मंगळयान 2028 मध्ये जाणार आहे. या मोहिमेचा मूळ उद्देश मंगळ ग्रहावरील पाणी आणि जीवनाचं अस्तित्व शोधणे, हा असेल. एअरबसचे शास्त्रज्ञ स्टीवनेजमध्ये रोव्हर बनवलं आहे. यामुळे यूके स्पेस क्षेत्रात 3500 लोकांना रोजगारही मिळाला आहे. कंपनी लवकरच युरोपियन स्पेस एजन्सीसोबत यासंबंधित करार करणार आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


चंद्रावर एलियन्स? नासाला अंतराळात दिसलं रहस्यमयी स्पेसशिप