सतत फोनवर बोलते म्हणून पत्नीला घटस्फोट
एबीपी माझा वेब टीम | 20 May 2016 04:17 AM (IST)
सौदी अरेबिया : नवविवाहित पत्नी आपल्या मित्रांशी तासंतास बोलते म्हणून सौदी अरेबियातील एका व्यक्तीने तिला तलाक दिला. पतीला पत्नीशी बोलायचं होतं, मात्र पत्नी फोनवर व्यस्त असल्याने तो बोलू शकला नाही. याच रागातून पतीने पत्नीला तलाक दिला. विशेष म्हणजे तलाकची ही घटना लग्न झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच घडली. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, एका नातेवाईकाने सांगितली, “लग्नानंतर पतीने पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला. नवविवाहित पत्नी हॉटेलमध्ये गेल्यावर फोनवर बोलण्यात व्यस्त झाली. पती तिच्या पत्नीजवळ गेला, तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी सारखं फोनवरच बोलत होती. पत्नीच्या कोणत्याही प्रश्नला प्रतिसाद देत नव्हती आणि त्यामुळे दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं.” त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झालं आणि पतीने आपल्या पत्नीला थेट तलाकच दिला. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, तलाकचं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं असून, आता प्रकरण समजुतीने सोडवण्यासाठी एका समितीकडे पाठवण्यात आलं आहे. मात्र, पती आणि पत्नी यांच्यातील कुणीही ऐकायला तयार नाहीत, अशी माहिती मिळते आहे.