सौदी अरेबिया : रविवार 24 जून हा सौदी अरेबियातील महिलांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण आजपासून सौदीतील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली आहे.


सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा देश होता, जिथे महिलांना वाहनं चालवण्यास परवानगी नव्हती. मात्र गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवत महिलांना दिलासा दिला. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन लायसन्स असलेल्या महिलांना आता सौदीमध्ये वाहनं चालवता येणार आहेत.



या निर्णयामुळे महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देऊन लायसन्स दिले गेले.लायसन्स मिळाल्यानंतर अनेक महिलां आजच्या दिवसाची खूप वाट पाहत होत्या. यापूर्वी सौदीतील महिला बाहेर जाण्यासाठी नातेवाईक, टॅक्सी चालक यांसारख्या अनेक जणांची मदत घ्यावी लागायची. पण आता त्या स्वत: ड्राइव्ह करु शकतात.