जूलिएथ गोंजालेज थेरन ही महिला एका जर्मन टीव्ही चॅनलसाठी रिपोर्टिंग करत होती. लाईव्ह रिपोर्टिंग चालू असतानाच एका फुटबॉल चाहत्याने महिला रिपोर्टरसोबत छेडछाड केली व तो तेथून निघून गेला.
लाईव्ह रिपोर्टिंग सुरु असल्याने हे सगळं दृश्य कॅमेरात कैद झालं आहे.
महिला रिपोर्टरकडून घटनेचा निषेध
घटना घडल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया न देता महिला रिपोर्टरने शांतपणे रिपोर्टिंग पूर्ण केले. पण नंतर या महिलेने छेडछाडीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकत लिहले, “ आमच्यासोबत अशा प्रकारचे गैरवर्तन करण्याचा कोणालाही हक्क नाही. आमचं कामही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्याबाबत आम्ही गंभीर आहोत. मी फुटबॉलचा आनंद शेअर करते, पण त्याचवेळी आपल्याला प्रेम आणि शोषण यांतील अंतर ओळखावे लागेल.”
ही महिला ज्या DW स्पोर्टस साठी काम करते त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर टाकत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.
गैरवर्तन करणाऱ्या चाहत्याने मागितली माफी
रिपोर्टरसोबत छेडछाड करणाऱ्या चाहत्याने अखेर त्या रिपोर्टरची माफी मागितली. “मित्रासोबत याबाबत लावलेली पैज जिंकण्यासाठी आपण असे केले,” असं संतापजनक कारण छेडछाड करणाऱ्या तरूणाने दिलं आहे.