इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये सध्या एक चहावाला सर्वाधिक चर्चेत आहे. हा चहावाला त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे सर्वांचं, विशेषत: तरुणींचं लक्ष वेधून घेत आहे. याच्या निळ्या नजरेने पाकिस्तानातीलच नव्हे तर भारतातील मुलीही अक्षरश: घायाळ झाल्या आहेत.


या चहावाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तमाम तरुणींनी आपली 'दिवानगी' जाहीर केली आहे. अर्शद खान असं या चहावाल्याचं नाव असून, तो अवघ्या 18 वर्षांचा आहे.

या चहावाल्याची तुलना थेट बॉलिवूड कलाकारांशी होत आहे.

केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही या चहावाल्याची मोठी चर्चा रंगली आहे.



जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला.

14 तारखेला सोशल मीडियावर स्टार झाल्यावर या अर्शदला आता मॉडेलिंगचीही ऑफर मिळाली आहे. इस्लामाबादच्या एका ऑनलाईन शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्याने अर्शदचे फोटोही पोस्ट केलेत. आणि तो आपल्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करेल असं जाहीरही करुन टाकलं आहे.

सध्या भारतातही अर्शद चहावाल्याचे फोटो ग्रुपग्रुपवर फिरत आहेत. सध्या भारत-पाकमध्ये जो तणाव आहे, त्यापार्श्वभूमीवर या निली आखोंवाल्या अर्शदला सोशल मिडियावर न्यूक्लिअर वेपन आणि सर्जिकल स्ट्राईक ऑन इंडियन गर्ल्स म्हणूनही संबोधलं जातंय.

निळ्या डोळ्यांच्या चहावाल्याचा 10 गोष्टी

1) नाव - अर्शद खान

2) अर्शदचं वय - 18 वर्ष

3) अर्शदला तब्बल 16 भावंडं आहेत

4) अर्शद हा मर्दन या खैबर पक्खुतन्वा प्रांतातील आहे.

5) अर्शदचं कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून इस्लामाबादमध्ये राहतं. अर्शद यापूर्वी फळविक्रेता होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने चहाचा गाडा सुरु केला.

6) अर्शदला चहावाला म्हटल्याचा राग येत नाही

7) अर्शदला मॉडेलिंग/अक्टिंगच्या ऑफरची आवड आहे

8) अर्शदला तशा अनेक ऑफर्सही आल्या आहेत

9) अर्शद खानचं स्वत:चं सोशल मीडियावर अकाऊंट नाही

10) आपण शाहरुख खानसारखं दिसतो, असं अर्शदला वाटतं.