European Space Agency : एक जुना उपग्रह पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत असून तो लवकरच जमिनीवर कोसळणार आहे. युरोपियन स्पेस एजंन्सीचा एक सॅटेलाईट कोणत्याही क्षणी पृथ्वीवर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सॅटेलाईट अंतराळातून जमिनीवर  कोसळणारअसून हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच पेट घेईल. 8 सप्टेंबरच्या दिवशी अवकाशात असलेला हा उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल आणि त्यानंतर कोणत्याही क्षणी पृथ्वीवर कोसळेल. 


अंतराळातून पृथ्वीवर कोसळणार सॅटेलाईट


युरोपियन स्पेस एजंन्सीचा साल्सा हा एक जुना सॅटेलाईट पृथ्वीच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून तो येत्या काही दिवसात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात येताच हा जुना सॅटेलाईट पेट घेईल. यामुळे हा एक पेटत्या गोळ्याप्रमाणे असेल. दरम्यान, युरोपियन अंतराळ संस्था नियंत्रण प्रकारे हा सॅटेलाईट पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे. अंतराळात कचरा निर्माण होऊ नये, यासाठी स्पेस एजंन्सी हा जुना सॅटेलाईट पृथ्वीवर आणण्याच्या तयारीत आहे. 


वातावरणाच्या कक्षेत आल्यावर पेट घेणार


जर सर्व काही नियोजित पद्धतीने पार पडलं तर हा सॅटेलाईट प्रशांत महासागरात कोसळेल. सुमारे 1.30 लाख किलोमीटर अंतर कापल्यानंतर साल्सा उपग्रह पृथ्वीवर पोहोचेल. गेल्या वर्षी याच एजन्सीने एओलस हवामान उपग्रह पृथ्वीवर नियंत्रित पद्धतीने सोडला होता. हा सॅटेलाईट प्रशांत महासागर पाडण्याचं नियोजन आहे. अशा प्रकारे उपग्रह पृथ्वीवर आणण्याला मार्गदर्शित री-एंट्री म्हणतात. यामध्ये उपग्रड निर्जन स्थळी पाडण्याची योजना आखली जाते.






चार उपग्रह अवकाशात पाठवले


युरोपियन स्पेस एजन्सीने 2000 मध्ये चार उपग्रह अवकाशात पाठवले होते. यामध्ये साल्सा, रंबा, टँगो आणि सांबा या सॅटेलाईटचा समावेश आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले होते. या चौघांचा एक क्लस्टर अवकाशात तयार झाला. गेल्या काही वर्षात या सॅटेलाईट्सने उत्तमरित्या काम पार पाडलं आहे. यातील साल्सा या उपग्रहाचं काम संपल्यानंतर आता हा उपग्रह पाडण्यात येईल. 


पृथ्वीवर माहिती पाठवण्याचं सॅटेलाईटचं काम


या क्लस्टर्सचे आयुष्य दोन वर्षे होतं, पण  साल्सा उपग्रह वगळता इतर सॅटेलाईट अजूनही कार्यरत आहेत. या चारही उपग्रहांनी सुमारे 24 वर्षा डेटा पाठवला आहे. 2002 मध्ये अवकाश संस्थेने अधिकृतपणे चार उपग्रहांचे क्लस्टर निवृत्त झाल्याचे घोषित केली होती. यानंतर चारही उपग्रह अवकाशात फिरत होते. अंतराळातील कचऱ्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन ईएसएने साल्सा सॅटेलाईटचा घनकचरा पृथ्वीवर आणण्याची योजना आखली आहे.