नवी दिल्लीः पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांनी इस्लामिक राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन मानवाधिकार परिषद आणि इतर संस्थांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. सरताज यांनी 56 देशांना पत्र लिहून दखल घेण्याची विनंती केली आहे.



भारताचा जालीम उपाय, पाकला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखणार?


 

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू नदी पाणीवाटप कराराबाबत घेतलेल्या भूमिकेने पाकिस्तानला घाम फोडला आहे. भारताने कडक पाऊलं उचलताच पाकिस्तानने इतर देशांकडे हात पसरवले आहेत. पाकिस्तानने इस्लामिक देशांना पत्र लिहून मदत मागितली आहे.


सिंधू नदी पाणीवाटप करारासाठी भारत बांधिलः सरताज


सरताज यांनी सिंधू नदी पाणी वाटप करारावरही प्रतिक्रिया दिली. भारत हा करार ठेवण्यास बांधिल आहे. त्यामुळे हा करार तोडणं अशक्य आहे. तरीही असं झालं तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टात जाईल, असंही सरताज यांनी सांगितलं.



खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका


 

पंतप्रधान मोदींनी काल सिंधू नदी पाणी वाटप करारासंबंधी महत्वपूर्ण बैठक घेत कडक भूमिका घेतली. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाहीत, असा इशारा देत मोदींनी पाकिस्तानला धडकी भरवली आहे. त्याचे परिणाम लगेच पाहायला मिळाले. पाकिस्तानने इस्लामिक देशांकडे मध्यस्थीसाठी हात पसरवले आहेत.