SaNOtize Corona Nasal Spray : जगभरात कोविडचा कहर वाढू लागलेला असतानाच ब्रिटनमधून एक दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या दृष्टीनं मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. सॅनोटाईज नेझल स्प्रे चाचणीमध्ये प्रभावी ठरल्याचं म्हटलं जात आहे. सॅनोटाईजच्या वापरानंतर कोरोनाबाधितांमधील विषाणूंचा प्रभाव 24 तासांमध्ये 95 टक्के आणि 72 तासांमध्ये 99 टक्के कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 


ही क्लिनिकल चाचणी बायोटेक कंपनी सॅनोटाईज रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटनच्या अॅशफूड अँड पीटर्स हॉस्पिटलनं केली आहे. शुक्रवारी या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. 


सध्या जगभरात विविध देशांमध्ये कोरोना लसींच्या वापराला मिळालेल्या मान्यतेनंतर लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यातच या स्प्रेच्या चाचणीला मिळालेलं यश पाहता, आणखी एक आशेचा किरण दिसू लागला आहे. 


पृष्ठभागावरुन कोरोनाचा प्रसार होतो का? अमेरीकेच्या संशोधकांची नवी माहिती


दरम्यान, जगभरात कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी सुरु असणाऱ्या असंख्य प्रयत्नांमध्ये नेझल स्प्रेला मिळालेलं हे यश पाहता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपायांमध्ये आणखी एका पर्यायाची जोड मिळाली आहे. आता या स्प्रेच्या वापराता नेमकी कोणत्या पातळीवर आणि कुठे मान्यता मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय भारतामध्ये या स्प्रेच्या वापरासाठी येत्या काळात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का, याकडेही साऱ्यांच्याच नजरा असणार आहेत. 


'या' देशात कोरोनाची लस घेतल्यानंतर रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा आणि बरंच काही....


भारतात रशियाच्या स्फुटनिक लसीच्या वापराला मान्यता 


संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच जगभरात कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी सध्या दिल्या जात आहेत. यात आता भारतीय औषध नियामकांकडून रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मान्यता देण्यात आली आहे.